माण तालुक्यातील शैक्षणिक परंपरा जिल्ह्यात उज्ज्वल

संजीवराजे नाईक-निंबाळकर : गोंदवले येथे शिक्षण विभाग आढावा बैठक उत्साहात

गोंदवले  – सातारा जिल्ह्यात माण तालुक्‍याची शैक्षणिक परंपरा अतिशय उज्ज्वल असून हे केवळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्यामुळे शक्‍य झाले असून यातून शिष्यवृत्तीमध्ये माण पॅटर्न तयार झाल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी गोंदवले खुर्द येथील तालुकास्तरीय शिक्षक आढावा बैठकीत केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोंदवले खुर्द येथे माण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने तालुकास्तरीत आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, अर्थ शिक्षण समितीचे सभापती राजेश पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, शिक्षणाधिकारी हणमंत जाधव, माण तालुक्‍याचे सभापती रमेश पाटोळे, उपसभापती नितीन राजगे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, गट विकास अधिकारी गोरख शेलार, प्रभारी गटशिक्षणाधिकारी बी. बी. चौगुले, शिक्षणविस्तार अधिकारी संगीता गायकवाड यांच्यासह तालुक्‍यातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, महात्मा फुले यांनी सर्व सामान्य लोकांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करून दिली, त्याच बरोबर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या रयत शिक्षण संस्थेचा विस्तार सातारा जिल्ह्यातून केला. शिक्षणाबाबत आस्था असणारी अशी थोर रत्ने जिल्ह्यात होऊन गेली. यांनी सुरू केलीली शैक्षणिक परंपरा जपण्याचे काम आपल्याला करायचं आहे. दुष्काळी माण तालुक्‍यातील अनेक रत्ने जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन सध्या राज्याचा कारभार सांभाळत आहेत.

माण ही रत्नांची खान आहे. या ठिकाणच्या गट विकास अधिकारी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी पुस्तकी शिक्षणासह खेळ, उद्योग, व्यवहारी गोष्टींवर देखील भर देत सर्व शिक्षकांच्या मध्ये समन्वय ठेवून शाळांचा दर्जा चांगला केला यामुळे माण तालुक्‍यातील आदर्श शिक्षण प्रणाली उदयाला येत आहे. प्रामुख्याने हे काम सगळ्या सातारा जिल्ह्यात आदर्श असून त्याचा इतरांनी आदर्श घ्यावा व हे काम असच पुढं चालावे यासाठी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी आणि त्यांच्या सर्व टीमला त्यांनी धन्यवाद दिले. शिक्षण सभापती राजेश पवार अरुण गोरे, रमेश पाटोळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाचे निवेदन हणमंत जगदाळे यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी संगीता गायकवाड यानी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)