माण- खटाव, फलटण तालुक्‍यांना पावसाची हुलकावणी

सातारा, दि. 6 (प्रतिनिधी)

दुष्काळी म्हणून ख्याती असलेल्या खटाव- माण व फलटण तालुक्‍यांना यंदाही पावसाने हुलकावणी दिल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांच्या तुलनेत या या तिन्ही तालुक्‍यांची आकडेवारी अत्यंत खालावलेली आहे.

जिल्ह्यात आज (शनिवारी) पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 249.37 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 18.39 मि.मी. पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.

सातारा- 23.03 (328.56) मि. मी., जावळी- 35.65 (360.67) मि.मी. पाटण-36.73 (278.34) मि.मी., कराड-9.77 (174) मि.मी., कोरेगाव-6.33 (158.56) मि.मी., खटाव-2.73 (95.97) मि.मी., माण- 0.0 (63.70) मि.मी., फलटण- 0 (58.33) मि.मी., खंडाळा- 1.20 (96.80 ) मि.मी., वाई 9.97 (153.24) मि.मी., महाबळेश्वर-123.95 (1208.98) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 2977.14 मि.मी. तर सरासरी 230.64 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.