“माणूस म्हणून जगायला शिकवलं” (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)

गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुदेव महेश्वर:। गुरु साक्षात्परब्रह्म तस्मैश्री गुरुवे नम:।।

लहानपणापासून हे वाक्य अनेक वेळा माझ्या कानांवर पडले, वाचण्यात आले, परंतु या वाक्याच अर्थ मला त्यावेळी उमजत नव्हता. पण आज अशा अनेक व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या, ज्यांच्यामुळे मला या वाक्याचा अर्थ कळाला आणि त्यांच्यासाठी हे वाक्य म्हणावेसे वाटले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसे तर माझ्या जीवनप्रवासात अनेक व्यक्ती मला शिकवून गेले आणि शिकवत आहेत. आपल्या आयुष्यात आपले आई, वडील हे तर आपले पहिले गुरू असतातच. परंतु मी माझ्या अशा गुरूबद्दल लिहणार आहे जिच्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली, ती म्हणजे माझी मैत्रीण, माझी गुरू “मानसी”.

आयुष्याच्या अशा टप्प्यावर आलो होतो, ज्यात जगण्याची इच्छा मरून गेली होती. पण तिने जगण्याचा खरा अर्थ शिकवला, जगण्यासाठी एक ऊर्जा दिली. तीच ऊर्जा घेत मी आज आनंदी जीवन जगतोय. रागावर नियंत्रण मिळवणे असेल अथवा माणसाला माणूस म्हणून पाहणं असेल, हे सर्व तिने मला शिकवलं. आपल्या आयुष्यात खूप काही करण्यासारखे आहे आणि आपण ते करायला हवं हे तिने मला शिकवलं. लोक आपल्याबद्दल काहीही बोलत असले तरी त्यांना मागे सोडत पुढे कस चालायचं. मित्रापासून ते आपल्या रक्तातील नाते कसे जपायचे. माणूस तर माणूस पण प्राणीमात्रावरही प्रेम करायला तिने शिकवलं. माझ्यातल्या सुप्त गुणांना वाव देत, त्या गुणांना बाहेर काढण्याचा काम तिने केलं. ती सोबत असली की, मला एक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मी पुढे चालत राहतो. या जीवनप्रवासात अनेक माणसं मिळाली, काहींनी चांगलं तर काहींनी वाईट शिकवलं. पण मानसीने मला माणूस म्हणून जगायला शिकवल आणि हेच माझ्यासाठी खूप आहे. स्वतःला भाग्यवान समजतो की, मानसी सारखी मैत्रीण आणि गुरू मला लाभली. प्रत्येकाला अशा व्यक्तींचा सहवास लाभत नाही, अशा व्यक्तीचा सहवास मला लाभला त्याबद्दल मी खूप नशिबवान आहे. मैत्रीची खरी व्याख्या काय ? हे तिच्याकडून शिकायला मिळालं.

‘मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची
पर्वा बी कुणाची’
या गाण्यांच्या बोलाप्रमाणे ती सतत मला पुढे जाण्यासाठी प्रेरित करीत असते. एकंदरीतच माणूस म्हणून जगायला शिकवणाऱ्या माझ्या गुरूला (मानसीला) गुरूपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा.

– मुस्तान मुमताज मुख्तार मिर्झा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)