माझ्या मुलीची आत्महत्या, नव्हे हत्याच!

कोरेगांव भिमाप्रकरण


पूजाच्या वडिलांचा आरोप

पुणे- ‘माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा खून करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला आहे’, असा आरोप पूजा सकट हिचे वडील सुरेश यांनी केला आहे. दरम्यान, पूजा ही कोरेगाव भिमाप्रकरणातील साक्षीदार होती. काही दिवसांपूर्वी तिचा मृतदेह विहिरीत आढळला होता. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नववर्षाच्या सुरूवातीलाच कोरेगांव भिमा येथे हिंसाचार आणि दंगल उसळली होती. त्यावेळी झालेल्या घर पेटवण्याच्या प्रकाराचा संदर्भ या घटनेशी लावण्यात येत आहे, असा आरोप पूजा हिच्या वडिलांनी केला आहे. “माझे घर ज्यांनी पेटवून दिले त्यांचा या हत्येत सहभाग आहे, ‘ असा आरोपही सुरेश सकट यांनी केला आहे.

पूजा सुरेश सकट ही शनिवारी दुपारपासून बेपत्ता होती. रविवारी दुपारी साडेबारा वाजता हिचा मृतदेह तिच्या घरापासून जवळच असलेल्या एका विहिरीत सापडला. याबाबत सुरेश सकट यांनी सांगितले की, “माझे कुटुंब गेल्या 15 वर्षांपासून भिमा कोरेगावमधील बांधकाम विभागाच्या जागेत राहत आहोत. माझ्या घरा शेजारचा प्लॉट एकाला विकत घ्यायचा आहे. मात्र, माझ्या पत्र्याच्या शेडमुळे त्या जागेची किंमत कमी होत आहे. घर सोडण्याबाबत काही दिवसांपासून मला धमकी देण्यात येत आहे.

त्याबाबत मी 18 नोव्हेंबर 2017 रोजी कोल्हापूर पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रारदेखील केली होती. दरम्यान, 1 जानेवारी भिमा कोरेगाव येथे दंगल झाली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझे घर जाळण्यात आले. त्यामागे देखील घर सोडण्याची धमकी देणाऱ्यांचा हात होता. याबाबत मी आतापर्यंत चार वेळा तक्रार दिली आहे. तसेच नुकताच पुरवणी जबाबदेखील दिला होता. त्यामुळे मी ज्यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्यामध्ये नाराजी होती. त्यातूनच त्यांनी माझ्या मुलीचा खून केला आहे.’

पूजा हिचा मृतदेह सुसन रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दोन डॉक्‍टरांच्या टीमने तिचे इनकॅमेरा शवचिच्छेदन केल्याची माहिती उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी दिली. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका तिच्या कुटुंबियांनी घेतली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)