माझा तुरुंगवास तात्पुरता -आसाराम बापू

जोधपूर – अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी जोधपूरमधील न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.सध्या आसाराम बापू जोधपूरमधील कारागृहात आहे. आसाराम बापूची एक ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. ‘माझा तुरुंगवास तात्पुरता आहे. अच्छे दिन नक्की येतील, असे आसाराम बापूने या क्लिपमध्ये म्हटले आहे.

१५ मिनिटांच्या या ऑडियो  क्लिपमध्ये आसारामने भक्तांचे आभार मानले आहे. निकालाच्या दिवशी शांतता कायम राखल्याबद्दल तसेच जोधपूर न्यायालयाच्या आवारात गर्दी न केल्याबद्दल त्याने समर्थकांचे आभार मानले. आपण सर्वांनीच कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर केला पाहिजे. काही लोकांनी मला आणि आश्रमाला बदनाम करुन स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी कट रचला. आश्रमाच्या लेटरहेडवर येणाऱ्या पत्रकांवर विश्वास ठेवू नका,असे आसाराम या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतोय. दरम्यान या क्लिपची गंभीर  दखल जोधपूर कारागृह प्रशासनानेही घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)