धर्मशाला – तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी माझा उत्तराधिकारी भारतातून असेल असे वक्तव्य धर्मशाला येथील कार्यक्रमात केले आहे. दलाई लामा यांनी १९५९ मध्ये तिबेट सोडले होते. या घटनेच्या ६० व्या वर्षपूर्ती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. चीनने जर माझा उत्तराधिकारी घोषित केला असेल तर त्याचा कधीही सन्मान केला जाणार नाही, असे विधान दलाई लामा यांनी केले. या विधानावर चीनने विरोध दर्शवला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दलाई लमा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? याच्या विषयी चर्चा सुरु आहे. चीनचा सध्याच्या दलाई लामांना विरोध आहे.
Ads