माजी विद्यार्थ्यांची विद्या विकास मंदिराला मदत

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी बुद्रूक येथील विद्या विकास मंदिर विद्यालयाला क्रीडा साहित्य खरेदी करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी अकरा हजार रूपयांचा धनादेश प्राचार्य आर. बी. हळदे यांच्याकडे सुपूर्त केला आहे, अशी माहिती माजी विद्यार्थी भाऊसाहेब फकिरा वळसे पाटील यांनी दिली.
विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रूक येथील 1995-96च्या माजी विद्यार्थ्यांनी अवसरी बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी 5 सिलिंग फॅन, टाव्हरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेसाठी 3 सिलिंग फॅन, वळसेमळा येथील जिल्हा परिषद शाळेसाठी 1 सिलिंग फॅन, निरगुडसर येथील जिल्हा परिषद शाळेसाठी 1 लोखंडी कपाट, गावडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेसाठी 4 हजार रुपये देण्यात आले आहेत. यावेळी आयोजित कार्यक्रमात विजय गावडे, संतोष गावडे, जे. ए. सुपेकर, सी. पी. शेवाळे, ए. एम. टाव्हरे, माजी विद्यार्थी, सरपंच सचिन हिंगे, भाऊसाहेब वळसे, प्रमोद हिंगे, रघुनाथ टेमकर, सचिन टाव्हरे, सुषमा हिंगे यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)