माजी नगरसेवकाच्या भावाला अखेर लेखाविभागात बढती

मुख्यसभेत गदरोळ : भाजपने बहुमताच्या जोरावर विषय केला मंजूर

पुणे – माजी नगरसेवकाच्या भावाला लेखाविभागात बढती देण्याच्या प्रस्तावाला महापालिका मुख्यसभेत विरोधकांनी जोरदार विरोध केला. अखेर महापौरांनी मतदान पुकारले. भाजपने बहुमताच्या जोरावर हा विषय मंजूर करून घेतला. काळे हे भाजपचे माजी नगरसेवक रमेश काळे यांचे बंधू आहेत, त्यामुळे हा विषय केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक कार्यालयाकडील उपमुख्य लेखापरीक्षक जागेवर सूर्यकांत राजाराम काळे यांना बढती देण्याचा प्रस्ताव मुख्यसभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला विरोधकांनी मुख्यसभेत विरोध केला. हा विषय न्यायप्रविष्ट असताना आणि काळे यांच्या बढतीवर आक्षेप घेतला जात असताना, असा प्रस्ताव मुख्यसभेत आलाच कसा, असा प्रश्‍न कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी विचारला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पदाची जी शैक्षणिक पात्रता आहे, त्यामध्ये काळे बसत नाहीत. असे असताना त्यांना बढती देण्याचा प्रस्ताव कसा काय आणला? असा प्रश्‍न या सदस्यांनी उपस्थित केला. तसेच केवळ माजी नगरसेवकाचा भाऊ आहे, या एका “क्रायटेरिया’वर कसा काय निर्णय घेऊ शकता, असाही प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. जर या बढती प्रकरणात हा क्रायटेरिया लावत असेल तर, सगळीकडे तोच लावावा लागेल असेही तुपे म्हणाले. विधी सल्लागारांनाही याबाबत खुलासा विचारण्यात आला. मात्र, अखेर महापौरांनी या विषयात मतदान पुकारले. 63 विरुद्ध 24 अशा बहुमताच्या जोरावर भाजपने हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. या मतदानात शिवसेनेने मात्र तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)