माजी जि. प. अध्यक्ष नारायणराव पवार यांचे निधन

भुईंज, दि. 26 (वार्ताहर) – कॉंग्रेसच्या विचारसरणीचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नारायण राव पवार (वय 85) यांचे गुरुवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. नारायण पवार जिल्हाभर अण्णा या नावाने परिचित होते. जिल्ह्यातील एक स्पष्टपणे बोलणारा व पारदर्शी म्हणून त्यांची ओळख होती.
शेती, कुस्ती व समाजकारणाची आवड असलेल्या अण्णांनी सरपंच पदापासून ते पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अशी राजकीय वाटचाल केली. किसनवीर कारखान्याचे संचालक, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदार कार्य पार पाडले. त्यांच्या पश्‍चात मुलगा रमेश पवार, पुतणे जयवंत पवार, महान महाराष्ट्र केसरी माणिक पवार यांच्यासह मुली, जावई, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिंधवली येथे कृष्णा नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)