माजी आमदार वसंतराव थोरात यांना विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली

हसतमुखाने स्वागत करणारे तात्या कार्यकर्त्यांशी मिस्कील शैलीत संवाद साधायचे. शिवाजी मराठा संस्थेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे ते बारकाईने लक्ष देत असत.

– गिरीश बापट, पालकमंत्री


माझ्या नगरसेवकपदाच्या कारकीर्दीत मंडईमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा बसविण्यासाठी तात्यांनी प्रयत्न केले आणि मी थोरात कुटुंबियांपैकी एक झालो.

– योगेश गोगावले, भाजप शहराध्यक्ष


प्रतापराव गोडसे आणि वसंतराव थोरात या दोन तात्यांनी पुण्याच्या गणेशोत्सवाला विधायक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. तात्या थोरात यांनी स्वाभिमानी कार्यकर्ते घडविले.

– अशोक गोडसे, दगडूशेठ गणपती मंडळाचे अध्यक्ष


राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आम्ही एकत्र काम केले. मी जिवाभावाचा मित्र आणि सहकारी गमावला.

– उल्हास पवार, माजी आमदार


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याविषयी थोरात यांना आस्था होती.

– रवींद्र वंजारवाडकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी


वसंतराव थोरात हे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. अखिल मंडई गणपती मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी समाजाच्या हितासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. 1977 साली त्यांनी कॉंग्रेस पक्षातर्फे पुणे लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम आणि आंदोलने केली. त्यांनी कॉंग्रेस पक्षातर्फे पुण्याचे महापौर पद भूषविले. त्यांच्या निधनामुळे कॉंग्रेस पक्षाने एक थोर नेता गमवलेला आहे.

– अशोक चव्हाण, कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)