माओवादी संबंध प्रकरण : सर्वोच्च न्यायालयात पुरावे सादर करणार

संग्रहित छायाचित्र

 पोलीस आयुक्तांची माहिती : गुन्ह्याची व्याप्ती मोठी, आणखी वाढणार

पुणे – पोलिसांनी बंदी घातलेली संघटना सीपीआय (एम)शी संबंधित असलेल्या पाच जणांना सबळ पुरावे असल्यानेच अटक केली आहे. आतापर्यंतच्या आणि यापुढे होणाऱ्या कारवाया ठोस पुरावे असल्यावरच करणार आहे. त्या पाच जणांना नजरकैदेत ठेवल्यानंतर दिलेल्या वेळेचा चांगला उपयोग करुन योग्य ते पुरावे आणि प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले जातील, अशी माहिती पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस आयुक्‍त म्हणाले, “याप्रकरणी पूर्वी ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्याडून जप्त केलेली कागदपत्रे आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स पुरावे यावरुन संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील विद्यार्थी, तरुण यांना लक्ष्य करुन जंगली भागात प्रशिक्षणाला पाठवयाचे. नंतर त्याचा चळवळ प्रसारासाठी वापर करायचा, याबाबत संवादाचे पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. शस्त्रांच्या खरेदीबाबत तसेच पैशांची उभारणी कशाप्रकारे करावयाची यासाठी त्यांचे अंर्तगत पत्रव्यवहाराद्वारे संवाद झाले. त्याबाबत ही सबळ पुरावे उपलब्ध आहे. शस्त्र खरेदीसाठी एकमताने कोणाला परवानगी आणि अधिकार देण्यात आले, ही बाब ही सदर पुराव्यांवरुन स्पष्ट झाली आहे. राजकीय नेत्यांवर जीवघेणा हल्ला करण्याचे नियोजन त्यांनी केलेले होते, ही बाबही सदर कागदपत्रांवरुन समोर आली आहे. माओवादी विचारसरणीचा प्रचार कशाप्रकारे पसरावयाचा याचे नियोजन ही संबंधित व्यक्तींनी केले होते. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींवर कारवाई करताना, योग्यप्रकारे कायद्याच्या चौकटीत करण्यात आलेली असून त्यांना त्यांच्या मातृभाषेत आणि हिंदीत जबाब वाचवून दाखविण्यात आला आहे. तसेच संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलेले आहे. सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून ती यापुढील काळात आणखी वाढणार,’ असे असल्याचे संकेत के. व्यंकटेशम यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)