माउलींच्या द्वारी लगबग भारी…; आळंदी सज्ज

पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर

आळंदी – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देवस्थानची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, भाविकांसाठी दर्शन बारी उभारण्याचे काम सुरू आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी आवश्‍यक त्या सर्व गोष्टींचे नियोजन करण्याची लगबग सध्या देवस्थानच्या वतीने सुरू आहे.

माउलींच्या पालखीचे मंगळवारी (दि. 25) सायंकाळी चार वाजता प्रस्थान होणार असून हा प्रस्थान सोहळा मंदिराबाहेरील भाविकांना पाहता यावा याकरिता देवस्थानच्या वतीने “लाइव्ह स्क्रीन’ बसविण्यात येणार आहे. घातपात, चेंगराचेंगरी सारखी घटना घडू नये यासाठी देऊळवाड्यात दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हीे, धातूशोधक यंत्रणा बसवण्यात येणार असून प्रस्थान सोहळ्याच्या दोन दिवस अगोदरपासून दर्शन बारीतील भाविकांना दिवसभर देवस्थानतर्फे खिचडी प्रसाद व चहा वाटप करण्यात येणार आहे.

वारकऱ्यांच्या सोयीसाठी देवस्थान ऍप उपलब्ध करणार असून याद्वारे सुविधा मिळविण्यात वारकऱ्यांना सोयीचे जाणार आहे. पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्‍वर वीर यांनी दिली. वारकऱ्यांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी इंद्रायणी नदीपलीकडे तात्पुरती दर्शनबारी उभारण्याचे काम सुरू आहे. देवस्थानची सध्या दीड हजार क्षमतेची दुमजली दर्शन बारी इमारत असून भाविकांची संख्या लक्षात घेता भक्‍ती सोपानपूल येथे नदी पलीकडे तात्पुरती दर्शन बारी उभारत पाच हजार भाविक एकत्र येत दर्शन घेऊ शकतील इतकी वाढविण्यात येणार आहे. प्रस्थान काळात घातपाताची शक्‍यता लक्षात घेता मंदिरात येताना पिशव्याव इतर साहित्य आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्याचे, पोलीस ठाणे, आजोळ घर या ठिकाणी मंडप उभारण्याचे काम सुरु होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)