मांढरदेव येथील सुशांत जेधे भारतात दुसरा

राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत यश

मांढरदेव – मांढरदेव तालुका वाई येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकणारा सुशांत मनोहर जेधे याने राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदक संपादन केले. मथुरा (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करताना 18 वर्षांखालील मुलांच्या गटात 6 किलोमीटर धावणे हे अंतर 18 मि 34 सेकंद या वेळेत पूर्ण करत सुशांतने द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक संपादन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या स्पर्धेत महाराष्ट्रासह तीस राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सुशांत जेधे याचे मुळगाव वेलंग (ता. वाई) येथील असून तो मांढरदेव येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयात इ. दहावीत शिकत आहे. सुशांत हा गेली तीन वर्ष मांढरदेव येथील मांढरदेव ऍथलेटिक फाऊंडेशन येथे धावण्याचा सराव करतो. सकाळी तीन तास व संध्याकाळी दोन तास तो सराव करतो त्याला ऍथलेटिक्‍स प्रशिक्षक राजगुरू कोचळे व धोंडीराम वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वीही त्याने अनेक राज्य स्पर्धा गाजवल्या आहेत व राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर वाई, पाचगणी, पुणे,सातारा, कराड या ठिकाणी झालेल्या विविध मॅरेथॉन स्पर्धेत तो विजेता आहे.

सुशांतच्या या यशाबद्दल सातारा जिल्हा ऍथलेटिक्‍स असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, सचिव संजय वाटेगावकर, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, तालुका क्रीडा अधिकारी बळवंत बाबर, काळेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव, उपाध्यक्ष सुखदेव मांढरे, सचिव तात्याबा मांढरे, सहसचिव रघुनाथ मांढरे, सर्व संचालक, मुख्याध्यापक भगवान एरंडे, सर्व शिक्षक, ग्रामस्थ, दुकानदार आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)