300 क्युसेकने विसर्गः 30 कि.मी. पर्यंत पाणी पोहचेल?
राहुरी – मुळा नदीवरील मांजरी व वांजूळपोईयेथील बंधारेभरण्यासाठी मुळा उजव्या कालव्यातून देवनदीत 300 क्युसेकनेपाणी सोडण्यात आले.
मुळा नदीतील बंधारेभरण्यासाठी धरणातून नुकतेच पाणी सोडण्यात आले. परंतु मुळा धरणात 14 हजार दलघफु पाणीसाठा शिल्लक राहिल्यानेधरणाच्या मोऱ्यांतून नदीपात्रात पाणी पडणे बंद झाले होते. परिणामी मांजरी येथील कोल्हापूर पध्दतीचा बंधारा अपूर्ण भरला. वांजूळपोई बंधाऱ्यात पाणीच पोहचले नव्हते.
नदीतील डिग्रस व मानोरी हे दोन्ही बंधारे भरले होते. मांजरी व वांजूळपोई बंधारे न भरल्याने शेतकऱ्यांनी ओरड केली होती. मुंबईत झालेल्या कालवा पाणी वाटप सल्लागार समितीच्या बैठकीत तातडीने निर्णय होऊन हे बंधारे भरण्यासाठी मुळा उजव्या कालव्यामधून देवनदीत पाणी सोडण्यात आले. जवळपास 28 ते 30 कि. मी. अंतरावरील कोल्हापूर बंधाऱ्यासाठी पाणी सोडण्यात आलेआहे. देवनदीतील मोठमोठे खड्डे, सध्याचे कडाक्याचे उन्ह यामुळे बंधाऱ्यांपर्यंत हे पाणी पोहोचणार का, बंधारा भरणार का, अशा शंका व्यक्त होत आहेत. सध्या मुळा उजव्या कालव्यातून 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बंधाऱ्यांसाठी 120 दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा