महेश मलानी सिंधमध्ये नॅशनल असेंब्लीत निवडून जाणारे पहिले ‘हिंदू’

कराची (पाकिस्तान) – महेश कुमार मलानी सिंध प्रांतातातून नॅशनल असेंब्लीत निवडून जाणारे पहिले हिंदू बनले आहेत. दक्षिण सिंध प्रांतातील थरपरकर येथील एनए-222 मतदार संघातून ते निवडून आले आहेत. महेश कुमारा मलानी हे पीपीपी (पाकिस्तान पीपल्स पार्टी)चे उमेदवार असून त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी अरब जकाउल्ला यांचा एकोणीस हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. अरब जकाउल्ला हे जीडीए (ग्रॅंड डेमॉक्रेटिअक अलाअयन्स) चे उमेदवार आहेत.

पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या महितीनुसार महेश कुमार मलानी यांना 1,06,630 मते मिळाली, तर अराब जकाउल्ला यांना 87,251 मते मिळाली आहेत. महेश कुमार मलानी यापूर्वी 2003 ते 2008 या काळाता राखीव कोट्यातून संसद सदस्य बनले होते. सन 2013 च्या निवडणुकीत महेश मलानी यांची सिंध प्रांताच्या विधानसभेवर निवड झाली होती. महेश कुमार मलानी ही राजस्थानी पुष्कर ब्राह्मण नेते आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2002 पर्यंत पाकिस्तानात हिंदूंना नॅशनल असेंलेसाठी मतदानाचा वा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा अधिकार नव्हता. राष्टाध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कायद्यात ही दुरुस्ती करून हिंदूना मतदानाचा व निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)