महूच्या सरपंचपदी हिराबाई रांजणे बिनविरोध

महू : नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सत्कार करताना व्ही. डी. गायकवाड शेजारी सुशील नाळे, एस. बी. निकम, विठ्ठल गोळे व इतर. (छाया ः सचिन भिलारे)

उपसरपंचपदी स्वाती गोळी यांची निवड
पाचगणी, दि. 29 (प्रतिनिधी) – महू (ता. जावळी) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हिराबाई लक्ष्मण रांजणे यांची तर उपसरपंचपदी स्वाती रमेश गोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांतर्फे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायतीची निवडणुकही बिनविरोध पार पाडण्यात ग्रामस्थांना यश आले. त्यामुळे सरपंच व उपसरपंचही एकमताने बिनविरोध करण्याचे ठरवण्यात आले. या निवडीसाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी हिराबाई रांजणे व उपसरपंचपदी स्वाती गोळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित सदस्य सुशील गोळे, अमोल खुडे, वंदना गोळे, नयना पंडित हे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी व्ही. डी. गायकवाड यांनी काम पाहिले त्यांना ग्रामसेवक सुशील नाळे यांनी सहकार्य केले. यावेळी प्रशासक एस. बी. निकम हे उपस्थित होते.
यानंतर ग्रामस्थांतर्फे सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सरपंच हिराबाई रांजणे म्हणाल्या, सर्व सदस्याना सोबत घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रलंबित विकासकामांचा पाठपुरावा करून पारदर्शकपणे महू गावाला सर्वांगसुंदर करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी सरपंच विठ्ठल गोळे, नारायण गोळे, शंकर गोळे, बाळू गोळे, दिलीप गोळे, भरत गोळे, संदीप गोळे, मोहन गोळे, धर्मा गोळे, दिलीप शिंदे, महादेव गोळे, रवींद्र पुजारी, ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत हिराबाई रांजणे यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल गोळे यांनी केले तर नारायण गोळे यांनी आभार मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)