महिलेचे अश्‍लील चित्रण करून अत्याचार

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमकी

जामखेड – महिलेचे अश्‍लील चित्रण करून सार्वजनिक ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देत, तीन वर्षांपासून अत्याचार केला. तसेच फिर्याद मागे घेतली नाही, तर तुला गोळ्या घालून ठार मारेल, अशी धमकी दिली, म्हणून एका महिलेने चौघांविरुद्ध जामखेड पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल झाला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की फिर्यादी महिला नोकरीस आहे. मुस्तफा अझरुद्दीन शेख, इम्रान सदरोद्दीन शेख, वसीम वाहेद कुरेशी, मुझफ्फर गणीभाई आतार (रा. सर्व सदाफुले वस्ती) या चार जणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्तफाने तीन वर्षांपासून वेळोवेळी अत्याचार करून कोऱ्या कागदावर व स्टॅम्पवर सह्या घेतल्या. अश्‍लील व्हिडिओ सार्वजनिक व्हायरल करण्याची धमकी दिली. 17 सप्टेंबर रोजी मुलांना मारण्याची धमकी दिली. पोलिसांतील फिर्याद मागे घेण्याची तसेच इतरांना काही सांगितले, तर खून करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. इम्रान सदोरोद्दीन शेख, वसीम वाहेद कुरेशी, व मुजफ्फर गणीभाई अतार यांनी फिर्यादीच्या घरात येऊन तिला धरले. डोक्‍याला पिस्तूल लावून आमच्या मित्राविरोधातील फिर्याद मागे घे, नाहीतर तुला व तुझ्या मुलाला ठार मारू, असा दम दिला. अत्याचार, जातीवाचक शिवीगाळ, आर्म ऍक्‍टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)