महिलेचा महिलेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा -दिल्लीतील अजब प्रकरण

नवी दिल्ली : महिलेने महिलेवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा केल्याचे अजब प्रकरण राजधानी दिल्लीत घडले आहे. 19 वर्षे वयाच्या एका युवतीने आणि तिच्या दोन साथीदारांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप उत्तरपूर्व दिल्लीतील 25 वर्षे वयाच्या एका महिलेने केला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या सामूहिक बलात्काराच्या फिर्यादीनंतर सुमारे पाच महिन्याने या युवतीला अटक करण्यात आली आहे.

25 वर्षाच्या या महिलेने 19 वर्षांची युवती आणि तिच्या साथीदाराविरुद्ध सीमापुरी पोलीसठाण्यात सामूहिक बलात्कार केल्याची फिर्याद केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकता (कलम 377) ला गुन्हा श्रेणीतून बाहेर ठेवल्याचा दाखला देत या युवतीने आपल्याविरुद्धची फिर्याद टाळली होती. मात्र आता सीआरपीसी कलम 164 खाली कडकड्डमा न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसमोर आरोपी युवतीची जबानी घेण्यात आली. अणि तिला अटक करून एक दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपण काही दिवसांपूर्वी नोकरी सोडली होती आणि बचतीच्या कामासाठी लोकांच्या भेटीगाठी घेत होती. त्यातच आपली भेट रोहित आणि राहुल या दोन युवकांशी झाली. त्यांनी भुलवून-फसवून आपल्याला दिलशाद कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये नेले आणि तेथे आपल्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी सदर युवती तेथे पाळत ठेवण्याचे काम करत होती. आणि नंतर तिनेही आपत्तीजनक खेळण्याचा वापर करून आपल्यावर लैंगिक अत्याचार आणि मारहाण केली असे फिर्यादी महिलेचे म्हणणे आहे. त्यावेळचे व्हिडियो शूटिंग करून आपल्याला ब्लॅकमेल करत त्या तिघांनीही अनेकवेळा आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा तिचा आरोप आहे.

गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचे ठरवल्यानंतरचे हे बहुदा पहिलेच प्रकरण असावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)