महिलेकडे खंडणीची मागणी

पिंपरी – महिलेशी फोनवर ओळख वाढवून तिचे फोटो मिळवले. त्या फोटोची अश्‍लील “व्हिडिओ क्‍लिप’ बनवली. ती “क्‍लिप’ सोशल मीडियावर “व्हायरल’ करण्याची धमकी देत महिलेकडे तीन लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील तीन महिन्यांपासून दिघी येथे सुरू होता.

याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आकाश शिंदे, संजय वाकुळे, प्रदीप गोडे, सविता गोडे, पूजा गोडे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन महिन्यांपूर्वी आरोपी आकाश याने फिर्यादी महिलेशी फोनद्वारे संपर्क साधून ओळख वाढविली. तिला विश्‍वासात घेत तिचे फोटो काढून घेतले. त्यानंतर अन्य आरोपींसोबत संगनमत करून आकाश याने पीडितेसोबतची एक अश्‍लील “व्हिडिओ क्‍लिप’ तयार केली. ही “व्हिडिओ क्‍लिप’ आरोपींनी संजय वाकुळे याच्या मोबाईल फोनवरून फिर्यादी यांच्या समाजातील काही लोकांच्या मोबाईलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवली. यामुळे फिर्यादी महिलेची त्यांच्या समाजात मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. त्यानंतर आरोपींनी महिलेकडे तीन लाख रुपयांची मागणी करत भाऊ, पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. पतीला सोडून देऊन माझ्याशी लग्न कर, आपण मस्त मज्जा करू असे म्हणून महिलेचा विनयभंग केला. याबाबत महिलेने दिघी पोलिसांत धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक भारत चपाईतकर तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)