महिला संघटनेच्या अध्यक्षांवर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

शिक्रापूर- डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे पाच-सहा महिला व एका इसमासह महिलेच्या घरामध्ये घुसून आम्ही महिला संघटनेच्या महिला आहोत, तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकवू, अशी धमकी देत तुम्ही सुनेला सासुरवास करता, असे केले तर तुम्हाला खलास करून टाकू, अशी धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी एका महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षासह, सचिव, कार्याध्यक्ष यांसह पाच महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे नर्मदाबाई भरत गव्हाणे आणि खंडू भरत गव्हाणे या मायलेकांना मारहाण झाली असून, या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार नर्मदाबाई या एकट्या घरी असताना अचानक एका महिला संघटनेच्या अध्यक्षा असलेल्या प्रीती चव्हाण, सचिव राजश्री पवार, कार्याध्यक्ष गोविंद कुमकर यांसह पाच अनोळखी महिला नर्मदाबाई यांच्या सुनेसह घरात घुसल्या व त्यांनी तुमची सून येथे राहणार आहे, असे सांगितले. त्यावेळी नर्मदाबाईंनी तुम्ही कोण सुनेचे आई वडील का आले नाही, असे विचारले असता या महिलांनी तुम्ही बाहेर निघा, तुमची सून येथे राहणार आहे, आम्ही महिला संघटनेच्या महिला असून तुम्ही सुनेला सासुरवास केला तर तुम्हाला खलास करून टाकू, तुम्हाला कायद्याच्या कचाट्यात अडकवू असे सांगत मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करत नर्मदाबाई यांना ओढत बाहेर काढले, त्यावेळी नर्मदाबाई यांचा मुलगा खंडू तेथे आला असता त्याला देखील शिवीगाळ, दमदाटी केली आणि त्या महिला निघून गेल्या. यानंतर नर्मदाबाई भरत गव्हाणे (रा. कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी एका महिला संघटनेच्या अध्यक्षा प्रीती सोमनाथ चव्हाण (रा. करंदी ता. शिरूर जि. पुणे), सचिव राजश्री पवार (रा. केंदूर, ता. शिरूर, जि. पुणे), कार्याध्यक्ष गोविंद कुमकर (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर, जि. पुणे, यांसह पाच अनोळखी महिला (संपूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)