महिला फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा फ्रान्समध्ये? 

मॉस्को – रशिया येथे यशस्वीरीत्या पार पडलेल्या फिफा फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेनंतर आगामी महिला फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेबद्दल चर्चा रंगत असतानाच या स्पर्धेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. कतार येथे पुढील वर्षी होणाऱ्या महिला विश्‍वचषक स्पर्धेचे ठिकाण बदलण्यात आले असून इराणऐवजी आता ही स्पर्धा फ्रान्स येथे होणार असल्याचे वृत्त आहे.

रशिया येथे झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेच्या वेळी आगामी विश्‍वचषकाबाबत मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करण्यात आले होते. यामध्ये कतार येथे आयोजित केलेल्या विश्‍वचषक स्पर्धेबाबत एक व्हिडीयो तेथील प्रसिद्ध अशा गोर्की पार्कच्या रेड स्क्‍वेअर मॉलमधील भिंतींवर दाखवला जात होता. तर स्पर्धेच्या आयोजना संदर्भात सविस्तर माहिती दिली जात होती.
तत्पूर्वी फिफाचे अध्यक्ष इन्फन्टिनो गियानी यांनी 2016 मध्ये फातमा समोरा यांची सचिव म्हणून नियुक्‍ती करताना त्यांना फुटबॉल संघटनेतील पहिल्या महिला सचिव होण्याचा मान दिला होता. मात्र रशिया येथील विश्‍वचषक स्पर्धेत त्या क्‍वचितच दिसून आल्या. त्या बहुतांश वेळ प्रसार माध्यमे व स्पर्धेपासून दूरच होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रशियातील विश्‍वचषक स्पर्धेमुळे फुटबॉल विश्‍वात महिलांच्या आणि पुरुषांच्या बाबतीत होणाऱ्या भेदभावातील फरक मिटविण्याच्या दृष्टीने काही पावले टाकण्यात आली. ज्यात महिला समालोचकांचा समावेश करण्यात आला होता. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेचे मार्केटिंगही केले जात होते. मात्र, फ्रान्सने याबाबत कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी मोहीम राबवलेली नव्हती. त्यामुळे फ्रान्सची यजमानपदासाठी झालेली निवड आश्‍चर्यकारक मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)