महिला प्रतिनिधींच्या सासवांची मारामारी

परस्परांविरोधात तक्रारी दाखल
महाबळेश्‍वर, दि, 6 (प्रतिनिधी)- पालिकेतील सत्ताधारी गटातील दोन महिला लोकप्रतिनिधींच्या सासुंची मंगळवारी रात्री साडेनऊ वाजजा फ्री स्टाईल मारामारी झाली. या मारामारीतनंतर दोन्ही बाजुंकडील मंडळी सहभागी झाल्याने त्या भागात एकच खळबळ उडाली होती. रात्री उशिरा परस्परांवर तक्रारी दाखल करण्यात आल्या. तक्रारीनुसार पोलिसांनी एका आरोपीच्या विरोधात विनयभंगासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नगरपालिका सोसायटीजवळच पालिकेच्या समाज मंदिरात एका महिला लोकप्रतिनिधीची सासू प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेते. नेहमीप्रमाणे मंगळवारी देखील रात्री 9 वाजता त्या महिलांसाठी असलेल्या प्रौढ शिक्षणाचा वर्ग घेण्यासाठी आल्या असता तेथे रमेश बंडु रोकडे आले व त्यांनी हे समाज मंदिर काय तुझे बापाचे आहे का असे म्हणत त्या महिलेचा ब्लाउज फाडला. हा प्रकार सुरू असतानाच तेथे रमेश रोकडे यांची पत्नी मिरा व मुलगा अमोल तेथे आला. या तिघांनी मिळून त्या महिलेला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. संबंधित महिलेने महाबळेश्‍वर पोलिसात या तिघांविरोधात आपली तक्रारी दाखल केली. तक्रारीवरून महाबळेश्‍वर पोलिसांनी रमेश रोकडे यांचे विरोधात विनयभंगासह मारहाण व शिवीगाळ तर त्यांची पत्नी मिरा व मुलगा उमेश रा सर्व नगरपालिका सोसायटी यांचे विरोधात मारहाण व शिवीगाळ केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, रात्री उशिरा रमेश रोकडे यांच्या पत्नी मिरा रोकडे यांनीही पोलिसात तक्रार दाखल केली. प्रौढ शिक्षण घेणारी महिला व तिच्या सोबत असलेल्या सागर संपत कांबळे, सुमीत संपत कांबळे व अक्षय पांडुरंग काकडे रा. तिघेही नगरपालिका सोसायटी महाबळेश्‍वर अशा चौघांनी मला व माझे कुटूंबियांना विनाकारण हाताने मारहाण केली व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली अशी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार महाबळेश्‍वर पोलिसांनी प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेणाऱ्या महिलेसह चौघांविरोधात मारहाण व शिवीगाळ केल्या प्रकरणी भादवी 323 504 506 व 34 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)