महिला डब्यात पुरुषांची घुसखोरी वाढली

पश्‍चिम रेल्वेचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
13 हजार पुरूष घुसखोरांकडून 28 लाख 67 हजाराचा दंड वसूल

मुंबई : महिलांसाठी राखीव असलेल्या डब्बातच महिला प्रवाश्‍यांचा प्रवास अद्यापही सुरक्षित नसल्याचे उघडकीस आले आहे. या महिलांच्या डब्यात घोसखोरी करणाऱ्या पुरूषांची दिवसेदिवस संख्या वाढतच आहे. ही घुसखोरी रोखण्यात रेल्वे प्रशासनाला अपयश येत आहे गेल्या वर्षभरात महिला डब्यातून घुसखोरी करणाऱ्या सुमारे 13 हजार पुरूषां ताब्यात घेऊन रेल्वे प्रशासनाने सुमारे 28 लाख 67 हजार 250 रुपये इतका दंड वसूल केल्याची माहितीच पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने आज न्यायालयात दिली. तसे प्रतिज्ञापत्रच सादर केले.

महिलांची सुरक्षितता तसेच वाढते रेल्वे अपघात रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात हेल्प मुंबई फाऊंडेशन आणि समीर झवेरी यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती .या याचिकेवर आज न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयात मध्य रेल्वे तसेच पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

महिलांच्या सुरक्षेसाठी पश्‍चिम रेल्वे ने विविध पावले उचलली असून व्हाट्‌सअप्पवर 9 सखी गृप तयार करण्यात आले आहेत.याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत ट्विटर द्वारेही महिलांच्या समस्यांना प्रतिसाद दिला जातोय. तर आरपीएफचे अधिकारीही महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात आले ले आहे.

आरपीएफ चे जवानां कडून कामात कुचराई झाल्यास त्यांच्या वरही कारवाई केली जाते. या वर्षी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या 108 आरपीएफ जवानांवर कारवाई करण्यात आल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमुद करण्यात आले आहे. न्यायालयाने रेल्वे प्रशासनाच्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत अखेर याचिका निकाली काढल्या .

*गर्दीला आळा घालण्यासाठी 15 डबा लोकल
मुंबई शहर आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांचा विचार करता दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 15 डबा लोकल चालविण्याचा निर्णय घेतला असून जलद मार्गावर या लोकल चालविल्या जातात. त्या प्रमाणे धीम्या मार्गावर 15 डब्याच्या लोकल चालवता येतील का याबाबतही अभ्यास केला जात आहे असे मध्य रेल्वेच्या वतीने प्रतिज्ञापत्रद्वारे स्पष्ट करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.