महिला आयोग अध्यक्षांचाच महिला आरक्षणावर किंतु

महिलांनी स्वत:चे स्थान निर्माण करून यश मिळवावे
नवी दिल्ली – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनीच महिला आरक्षणाच्या विषयावर आपल्या मनात किंतु असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की संसद किंवा विधानसभेत महिलांना आरक्षण दिले की त्याचा लाभ पुढाऱ्यांच्याच पत्नी किंवा मुलींना मिळतो. त्यावेळी महिलांनी स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करून ही पदे आपल्या कर्तुत्वावर मिळवावीत असे मत त्यांनी व्यक्‍त केले आहे.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व अन्य विरोधी नेत्यांनी संसद व विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षणाचा विषय मार्गी लावावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. संसदेच्या चालू अधिवेशनातच सरकारने हे विधेयक मांडावे आम्ही त्याला बिनशर्त पिांठंबा देऊ अशी सूचनाहीं विरोधी नेत्यांनी केली आहे त्या पार्श्‍वभूमीवर रेखा शर्मा यांनी हे मत व्यक्त केले आहे. आरक्षणाच्या आधारे राजकारणात प्रवेश करणे आपल्या सारख्य महिलांना अवघड अणि जिकीरीचे आहे. त्या आज महिला आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिला आरक्षण विषयक परिसंवादात बोलत होत्या. देशातील निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. त्यांचे सक्षमीकरण अधिक महत्वाचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राजकीयदृष्ट्या महिलांचे सक्षमीकरण झाले नाही तर महिलांची उन्नती होणार नाहीं असे त्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या की आज स्थानिक पातळीवरील आरक्षणामुळे पंचायत समित्यांवर महिलांची निवड झाली आहे पण आपण तेथे नेमके काय काम करायचे आहे याची त्यांना कल्पनाच अजून आलेली नाही. सरकार पंचायतींना नेमका किती निधी देते आणि तो कसा वापरायचा याचीही त्यांना कल्पना नसते. अनेक ठिकाणी मग त्यांचे वडिल,पती किंवा भाऊच सारा कारभार चालवताना चालवताना आढळून येतात.

महिलांना जर राजकारणात करीअर घडवायचे असेल तर त्यांनी आपले कौटुंबिक हित सोडून राजकीय सक्षमता मिळवली पाहिजे. अशा परिस्थितीत नवरे लोकांची मानसिकताही बदलण्याची गरज आहे असे प्रतिपादनही त्यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)