महिलांमधील लठ्ठपणाकडे मोठ्या प्रमाणात होतय दुर्लक्ष

जगभरात लठ्ठपणाच्या आकडेवारीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे


दीर्घकालीन आजारांकरिता लठ्ठपणा हा एक महत्त्वाचा धोक्‍याचा संकेत आहे


वजनाच्या व्यवस्थापनामध्ये आहारातील प्रथिने ही एक अहम भूमिका पार पाडतात

जगभरात लठ्ठपणा हे आरोग्याकरिता सामाजिक स्तरावर एक आव्हान ठरते आहे. 2016 मध्ये 650 दशलक्ष प्रौढ लठ्ठ किंवा वजन जास्त असलेले आढळून आले. भारताबद्दल बोलताना, आपल्या देशात सध्या लठ्ठपणा नामक टाईम बॉम्ब असल्याचे दिसून येते. जागतिक लठ्ठपणा समिती (डबल्यूओएफ़) नुसार 48.3 दशलक्ष भारतीय लोकसंख्या ही 2025 पर्यंत लठ्ठपणा या वर्गात मोडू लागेल. गेल्या दशकात 2005-06 पासून आत्तापर्यंतचा विचार केला तर महिलांची लठ्ठपणाची टक्केवारी ही 13% पासून 21% वर आलेली आहे. याची संख्या वाढतच चालली आहे- एक जीवनशैली समस्या- सामाजिक आरोग्य समस्या ज्याकडे अजूनही दुर्लक्षच केले जाते आहे.

देशातील लठ्ठपणाचा दर लक्षात घेता ही एक चिंतेची बाब आहे. सामाजिक स्तरावर आरोग्या संबंधित पोषण आणि शारीरिक क्रियाशीलता वाढविण्याचा प्रयत्न करून सुद्धा महिला आणि इतर समूहांमध्ये यात सातत्याने वाढ होत आहे. आता वेळ आली आहे ती लोकांना वेगळ्या जीवनशैलीचा अवलंब करण्याची, नाही तर लठ्ठपणा त्यांचा ताबा घेऊ लागेल किंवा त्यांना त्याकरिता तशी किंमत मोजावी लागेल. असे पुण्याच्या प्रसिद्ध आणि नोंदणीकृत आहारतज्ज्ञ डॉ. गीता धर्मट्टी म्हणतात.

लठ्ठपणामुळे महिलांच्या जीवनावर विविध मार्गाने परिणाम दिसून येतो. ही संपर्काविना होणाऱ्या आजारांची (एनसीडी) नांदी असून यामुळे वेगवेगळ्या गुंतागुंती देखील उद्‌भवतात. ह्रदय रोगापासून गर्भधारणेच्या समस्यांपर्यंत सगळी लठ्ठपणाची वर्गीकरणे असू शकतात जी अखेरीस विनाशकारीच ठरतात. आरोग्यावर यामुळे होणारे परिणाम हे गंभीर दीर्घकालीन असून यामुळे मृत्यूस देखील आमंत्रण दिले जाऊ शकते.

महिलांमध्ये लठ्ठपणाची कारणे देखील वेगवेगळी असू शकतात. ऊर्जेचा असमतोल, अंतरस्राव वैद्यकीय समस्या आणि काही औषध ही देखील लठ्ठपणासाठी जबाबदार असू शकतात. अनुवंशिकता ही देखील कारणीभूत असू शकते, पण फ़ारच कमी प्रमाणात. काही लोकांमध्ये इतरांपेक्षा वजन वाढण्याची क्रिया ही अगदी सहज होते, पण याचा अर्थ असा नाही की त्यांना वजनामुळे होणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

लठ्ठपणावरती योग्य वेळेलाच आळा घालणे महत्त्वाचे असते आणि एक चांगली बातमी म्हणजे- असे करणे शक्‍य देखील आहे. निरोगी सवयी आणि जीवनशैलीमध्ये बदल यामुळे आपण लठ्ठपणाला अगदी किनाऱ्यावर ठेवू शकाल. बरीचशी लोकं आपले योग्य वजन व्यवस्थापित करण्याकरता योग्य आहार आणि क्रियाशीलतेवर अधिक भर देतात.

वजनासह, आरोग्यदायी आहाराच्या पर्यायांचा सगळ्यांना फ़ायदाच होतो. कडधान्य, डाळी, फ़ळे आणि भाज्यासांसह, कमी चर्बी असलेले दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घ्यावे तर साखर, फ़ॅट, मीठ या गोष्टींसह रिफ़ाइन्ड उत्पादनांमध्ये कमतरता असा निरोगी आहार सगळ्यांच्याच जीवनाचा एक भाग असावा. निरोगी खाण्याकरता प्रत्येक व्यक्तीच्या गरजांनुसार योग्य प्रमाणात पोषक तत्त्वं घेणे फ़ारच गरजेचे आहे. उदाहरणार्थ, चर्बी असलेला आहार कमी करण्यापेक्षा योग्य आणि पुरेशा प्रमाणात प्रथिने घेण्यावर अधिक भर द्यावा. वजनाचे व्यवस्थापन करताना प्रथिनांना प्राधान्य देणे ही एक उत्तम कल्पना आहे; यामुळे सुरक्षित पद्धतीने स्नायूंचा द्रवमान राखला जातो आणि चयापचय देखील सुधारते. प्रथिनांचा समावेश आहारात केल्याने वरती नमूद केलेल्या लाभांसह वजनाचे व्यवस्थापन अगदी सहजतेने होते.

प्रथिनांची निवड करताना इतके पर्याय उपलब्ध असताना, योग्य पर्याय कोणता निवडावा ही एक समस्या असते? नेहमी वनस्पतींवर आधारित प्रथिनांची निवड करावी; यामुळे उत्तम पोषण तर मिळतेच पण कॅलरीचे प्रमाण देखील कमी असते.
आपण लठ्ठपणाकडे कशा दृष्टिकोनातून बघणार आहोत आणि त्याला मागे टाकण्याकरता काय करणार आहोत हे फ़ार महत्त्वाचे आहे.

निरोगी आहार घेण्यासह शारीरिक क्रियाशीलता वाढविल्यास आपल्याला परिणामकारकतेची हमी मिळू शकते. समजा आहारातील प्रथिनांचे प्रमाण पुरेसे नसेल तर पुरक आहाराचा अवलंब करणे ही एक पद्धती अवलंबता येऊ शकते, यामुळे योग्य पोषण तर मिळेलच पण लठ्ठपणामुळे होणाऱ्या समस्यांवर पण आळा घालता येऊ शकेल. आवश्‍यकता आहे ती शिफ़ारस केलेल्या आहारातील प्रथिनांचा समावेश हा आपल्या रोजच्या आहारात करण्याची. असे देखील डॉ. गीता धर्मट्टी म्हणाल्या

वनस्पतींवर आधारित प्रथिनांचा पुरक आहार हा सहज पचतो आणि त्यात 9 आवश्‍यक अमिनो सिड्‌स देखील असतात, ज्यामुळे योग्य पीडीसीएएएस गुण (प्रोटिन डायजेस्टिबिलिटी-करेक्‍टेड अमिनो सिड स्कोअर) मिळू शकतात, फ़ॅटचे प्रमाण कमी करावे आणि लॅक्‍टोजला नाही म्हणावे. लठ्ठपणाकडे एका टाईम बॉम्ब समान बघितले जाते जो कधीही फ़ुटू शकतो. खरं तर तो फ़ुटलाच आहे, पण आपण त्याला गांभीर्याने घेतलेले नाही!

भारत लठ्ठपणाच्या मध्यावरती येऊन ठेपला आहे आणि बरीच लोकसंख्या ही त्याला बळी पडू शकते. हे सामाजिक आरोग्याचे आव्हान प्रत्येक व्यक्तीने आपल्या वजनाची आणि आरोग्याची योग्य जबाबदारी घेतल्याने नक्कीच संपुष्टात येऊ शकते.चला तर मग आपण वाढणे याचा अर्थ हा जास्त असलेले वजन कमी करणे आणि आरोग्य धोका टाळणे या अर्थाने घेऊ या.

डॉ. गीता धरमती


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)