महिलांना निरोगी आरोग्य व उद्योजकतेचे मार्गदर्शन

वाघोली- “मी शक्ती मी सबला’ या सामूदायिक विषयावर काम करत असताना असे जाणवले की ब-याच महिलांचे आरोग्यकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक महिला हि खुप शक्तीशाली आहे व ती सबलही आहे हाच संदेश घेऊन महिला सबलीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन वसुधा शिंदे यांनी केले. महिलांनी निरोगी राहून उद्योगात कार्यरत राहावे, प्रतिष्ठेसह उत्पन्न मिळविण्यासाठी क्रियाशील व्हावे, यासाठी वाघोली येथील सुप्रिम आंगण सोसायटीतील महिलांना मार्गदर्शन करताना वसुधा शिंदे बोलत होत्या. यावेळी महिलांच्या निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत सकाळी लवकर उठून व्यायाम आणि योगासने, प्राणायम याबाबत, तसेच पौष्टिक आहाराबाबत माहिती देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)