महिलांना त्रास देणाऱ्या नेपाळी व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू

 

पुणे,दि.28- घरातील महिलांना विनाकारण त्रास दिला म्हणून एका नेपाळी व्यक्तीस लाकडी दांडके, बॅट तसेच लाथेने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला मारहाण करुन मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी तीघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे.
अर्जुन लामीछाने(35 , मुळ नेपाळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे (राजेश ईश्‍वर जाधव(45), रमेश बालाजी बक्के(29), बाबुराव कानीराम राठोड(40,रा.भैरवनाथ मंदिराजवळ , खराडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अटक आरोपी हे रोजंदारीवर काम करतात. तर मयत हा कामाच्या शोधात पुण्यात आला होता.
यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितले,अर्जुन हा मुळाच नेपाळ येथील लुमिनी राज्यातील नवलपुर येथील आहे. तो कामधंदा शोधण्यासाठी काही दिवसांपुर्वीच खराडी येथे आला होता. येथे तो त्याच्या गावाकडील काही व्यक्तींसोबत रहात होता. बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने शेजारी रहाणाऱ्या एका महिलेच्या घराचा दरवाजा वाजवून पाणी मागुन त्यांना त्रास दिला. याबाबत तेथील रहिवाशी आरोपी राजेश जाधव याने त्यास जाब विचारला .यामुळे चिडून अर्जुन याने त्याला हाताने मारहाण करुन दगड मारला. याच वेळी त्याने दुसरा आरोबी बाबु राठोड याच्या पत्नीचा अचानक हात धरला. यावेळी त्यांच्यामध्ये वादावादी झाल्यावर तो तेथून निघुन गेला होता. दरम्यान आरोपींनी त्याला पहाटे सव्वा पाचच्या दरम्यान खराडी गावठाण येथील नाल्याच्या जवळ गाठले. तेथे राजु जाधवणे धोपाटण्याने, रमेश बक्केने लाकडी दांडक्‍याने व बाबुराव राठोड याने लाथेने मारहाण केली. तो बेशुध्द पडला असावा असे समजून ते तेथून निघुन गेले होते. मात्र मार वर्गी लागल्याने अर्जुनचा मृत्यू झाला. अर्जुनच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार तो थोडा वेडसर असल्याने अशाच प्रकारे वागत होता. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वराळ करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.