महिन्यातील शेवटचे तीन दिवस बँका राहणार बंद…

मुंबई : देशात सुरु असणाऱ्या पैशांच्या तुटवड्यातआणखी भर पडणार असल्याचे दिसत आहे. मात्र ही भर या महिन्याच्या शेवटच्या दिवसातील बँकाच्या सुट्यांमुळे पडणार आहे. महिन्याच्या शेवटच्या तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. याचा सरळ सरळ एटीएमच्या सेवेवर परिणाम होणार आहे.

तीन दिवस बँका बंद असल्यानं पैशांचा तुटवडा होऊ शकतो. 28 एप्रिलला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. तर 29 एप्रिलला आठवड्याची सुट्टी म्हणजेच रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. तसेच सरकारने 30 एप्रिल रोजी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे शुक्रवार 27 एप्रिलला एटीएममध्ये रोकड टाकण्यात येईल. तसेच सद्यस्थितीत एटीएममध्ये पुरवठ्यापेक्षा कमी रक्कम आहे. सलगच्या सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे एटीएमवर ग्राहकांची मोठी गर्दी होणार आहे. मात्र, ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एटीएममध्ये पैशांचा जास्तीचा भरणा करण्यात आल्याचे बँकाकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)