महासभेत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा निषेध

पिंपरी – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरुन देखील शहरात ऐन सणासुदीच्या काळातही पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याचा संताप व्यक्त करत शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी महासभेत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध केला.

अश्विनी चिंचवडे म्हणाल्या की, कटीबद्धा जनहिताय हे महापालिकेचे ब्रीद वाक्‍य आहे. यास अनुसरून सर्वांना समान, शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य आहे. गणेशोत्सव कालावधीत चिंचवड परिसरातील पाणी पुरवठा संपूर्णपणे विस्कळीत होता. त्या नंतर देखील अपुऱ्या व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील अनेक महिला नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आपले सण, संस्कृती संवर्धनाचे काम करतात. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची दिनचर्या, दैनंदिन कामकाज बिघडून नागरिक व महिला भगिनींना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. काही भागात केवळ अर्धा तास आणि ते देखील कमी दाबाने पाणी पुरवले जाते. पाणी न येणे, उशिरा येणे, कमी दाबाने येणे यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत.

चिंचवड परिसरात समान व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभागाला द्याव्यात. अन्यथा महिला तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही नगरसेविका चिंचवडे यांनी दिला. विस्कळीत पाणी पुरवठ्याबाबत त्यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना खुलासा मागितला. मात्र, आयुक्‍त यावर निरुत्तर झाले. त्यामुळे दाद मागायची कोणाकडे, असा सवाल नगरसेविका चिंचवडे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)