महाविद्यालय, सरकारी कार्यालये डेंग्यूच्या विळख्यात

21 खासगी तर 21 शासकीय अस्थापनांना आरोग्य विभागाची नोटीस
पुणे – सर परशुरामभाऊ महाविद्यालय, मॉर्डन महाविद्यालय, वाडिया महाविद्यालय, मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय आदींबरोबरच पोलीस आयुक्‍तालय, सेंट्रल बिल्डिंग, पाषाण महावितरण कार्यालय, कात्रज बस डेपो आदींसह 43 ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे शहरातील विद्यार्थी व शासकीय कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

शहरात आतापर्यंत 22 शाळा व महाविद्यालये व 21 शासकीय कार्यालयांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने त्यांना नोटीस पाठविल्या आहेत. तसेच शहरात अजूनही काही ठिकाणी तपासणी व औषध फवारणी सुरू आहे. नागरिकांनी वेळीच काळजी घेतली तर त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार नाही.
– डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, पालिका आरोग्य विभाग

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियासारख्या साथींच्या रोगाचा फेलाव होतो. अशातच पालिकेने पावसाळ्यापूर्वी नागरिकांनी डास उत्पत्ती होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती केली होती. शासकीय कार्यालये व महाविद्यालय हा तसा एकूणच शिक्षित व जागरुक वर्ग असणे अपेक्षित आहे. मात्र पालिकेला याच वर्गाला नोटीस पाठवत जागरुक राहण्याचे आवाहन करावे लागत आहे.
याबाबत पालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, पालिकेने शाळा व महाविद्यालय परिसराची तपासणी केली असता शाहू महाविद्यालय, सेंट मिराज विद्यालय, राठी महाविद्यालय, डेक्‍कन महाविद्यालय, राजा धनराजगिरजी महाविद्यालय, मुक्‍तांगण शाळा, सिंबायोसिस महाविद्यालय, येरवड्यातील आंबेडकर महाविद्यालय, शासकीय वसतिगृत आदी ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. तर, शासकीय कार्यालयांमध्ये कात्रज बस डेपो, पोलीस आयुक्‍तालय, मार्केट यार्ड पोस्ट ऑफिस, भवानी पेठेतील अन्न व पुरवठा खाते, लक्ष्मी रस्त्यावरील पीडीसीसी बॅंक आदी ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने या कार्यालयांना नोटीस देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शाळा महाविद्यालयांची तपासणी अद्यापही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)