महावितरण कार्यालयात मशीन नसल्याने ग्राहकांचे हाल

सातारा : महावितरण कार्यालयासमोरील वीज बिल केंद्रात ग्राहकांच्या लागलेल्या रागा. (छाया : संजय कारंडे)

सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) – सातारा येथील प्रतापगंज पेठेत महावितरण कार्यालयात तांत्रिक करणामुळे वीज बिल भरणा बंद असल्याने समोरील वीज बील केंद्रात नागरिकांच्या दररोज रांगा लागत आहेत. ग्राहकांना वीज बिल भरण्यसाठी भर पावसात बिल भरण्यासाठी उभे रहावे, लागत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रतापगंज पेठेतील महावितरणच्या कार्यालयात वीज बिल भरण्यासाठी असलेले मशीन संबंधित संस्थेकडून मुदत संपल्याने काढून नेण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना कार्यालयासमोरील वीज बिल केंद्रामध्ये बिल भरावे लागत आहे. यापुर्वी दोन्ही ठिकाणी ग्राहक जात असल्याने संख्या विभागली जावून गर्दी कमी होत होती. मात्र, ऐन पावसाळ्यात महावितरण कार्यालयातीलच वीज बिल भरणा सध्या बंद करण्यात आला आहे. यामुळे सर्व ग्राहकांना भर पावसात बिल भरण्यासाठी उभे रहावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही परिस्थती असूनही महावितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यालयातून बाहेर येवून एकदा ग्राहकांचे हाल पहावेत आणि वीज बिल भरण्यासाठी पर्यायी व्यवस्था त्वरित उभी करावी, अशी मागणी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)