महावितरण कर्मचाऱ्यांना टेस्टर व इन्सुलेशन टेप चे वाटप

पिंपरी –शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 92 व्या जयंतीचे औचित्य साधून महावितरण कंपनीच्या कासारवाडी शाखेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षतेसाठी टेस्टर व इन्सुलेशन टेप वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड विधानसभा संघटक तथा विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांच्या संकल्पनेतून व महावितरण कंपनीच्या कासारवाडी शाखा भारतीय कामगार सेना युनिट यांच्या पुढाकाराने याकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भारतीय कामगारसेनाआय.टी.सेल महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नांदेड दक्षिण विधानसभा संपर्कप्रमुख दीपक शेडे, शिवसेना समन्वयक तथा विद्युत सनियंत्रण समिती सदस्य भारत आबा कुंभारकर, खडकवासला उपतालुका संघटिका भावना थोरात, भारतीय कामगार सेना महावितरण पुणे परिमंडळचे अध्यक्ष राजेश गाढवे, कासारवाडी शाखा सहाय्यक अभियंता सुनील जगताप, सिद्धार्थ थोरात, मनोहर शिंदे, प्रदीप बेळगावकर, ओमप्रसाद परदेशी आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)