महावितरणाच्या विरोधात स्वाभिमानी आक्रमक

अनावश्‍यक आकारणी थांबवा अन्यथा जशास तसे उत्तर
सातारा,दि.29 प्रतिनिधी- महावितरणकडून घरगुती तसेच कृषी पंप कनेक्‍शनच्या माध्यमातून चालविलेली लूट तात्काळ थांबवा अन्यथा जशास तसे उत्तर देण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. तसेच 2 ऑक्‍टोबर रोजी पुणे -बॅंगलोर महामार्गावर नागठाणे येथे ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे.
स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, रामचंद्र निकम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वीज नियामक आयोगाची भीती दाखवून वीज वितरणकडून नागरिकांची लूट करण्याचा प्रकार सुरू आहे. विद्युत ग्राहकाला व शेतकऱ्यांना कोणतीही पुर्व कल्पना न देता अचानक पुरवठा बंद करण्यात येत आहे. तसेच विद्युत दरात अचानक वाढ करण्यात येत असून विद्युत दाब अचानक वाढल्यामुळे घरगुती उपकरणांचे व कृषी मालाचे नुकसान होत आहे. या नुकसानीची भरपाई देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्याचबरोबर विविध अधिभार लावून लुट करण्यात येत आहे. जळालेला फ्युज, डीपी बदलण्यासाठी वर्गणी स्वरूपात खंडणी गोळा करण्यात येत आहे. या सर्व तक्रारींचे निराकरण तात्काळ करून पठाणी वसूली थांबविण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी निवेदनाव्दारे सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)