महालोकअदालतमधील समुपदेशनामुळे तीन वर्षांपासून वेगळे राहणारे पती-पत्नी आले एकत्र

पुन्हा नव्याने संसार सुरू

पुणे – महालोकअदालतमध्ये केलेल्या समुपदेशानुळे तीन वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या पती-पत्नींनी पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्याचा विचार करत दोघांनी हा निर्णय घेतला. न्यायमूर्ती व्ही.आर. जगदाळे यांच्या पॅनेलमसमोर हा निर्णय झाला आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. ते पिंपरी चिंचवडचे रहिवाशी आहेत.
माधव 28 वर्षांचा आहे. तर माधवी 22 वर्षाची आहे. लग्नानंतर दोघात वैचारिक मतभेद होऊ लागले. त्यामुळे माधव माधवीला नांदवत नव्हता. त्याने शिवाजीनगर न्यायालयात 2015 मध्ये घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला होता. तीन वर्षांपासून दोघे विभक्त राहत होते. रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये न्यायमूर्ती जगदाळे यांच्या पॅनेलसमोर दोघांचे समुपदेशन करण्यात आले. दोघांनी भविष्याचा विचार करत झाले-गेलेले विसरून नव्याने पुन्हा संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला. न्यायमूर्ती जगदाळे, माधवचे वकील ऍड. संतोष काशिद, ऍड. सुनील क्षीरसागर यांनी तडजोडीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)