महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५० टन तूरडाळ केरळला रवाना

मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेल्वेला दाखविला हिरवा झेंडा

मुंबई: केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने50 टन तूरडाळ मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नेत्रावती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून कुर्ला टर्मिनल्स येथून आज रवाना केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

क्रेडाई एमसीएचआय, जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, राजस्थानी वेल्फेअर असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टेट-को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, नियंत्रण कक्ष संचालक दौलत देसाई, शिधावाटप नियंत्रक दिलीप शिंदे, शिधावाटप उपनियंत्रक मधुकर बोडके,चंद्रकांत थोरात, माजी अपर मुख्य सचिव शेहजाद हुसैन तसेच रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, देशातून केरळमधील पूरग्रस्तांसाठी विविध स्तरांतून सहानुभूतीपूर्वक मदतीचे हात पुढे येत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपत्तीग्रस्त राज्यांना मदत करण्यास महाराष्ट्र राज्य आग्रही राहिले आहे. यापूर्वी पूरग्रस्तांसाठी शासनाच्या वतीने 20 कोटी, एसटी महामंडळाकडून 10 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून मदतीचे हात पुढे येत आहेत. अनेक संस्थांनी मदत केली गेली आहे. केरळमधील पूर ओसरला असून तेथील पूरग्रस्तांना डाळ, तांदूळ, तृणधान्य, सुकामेवा, बिस्किट अशा विविध टिकणाऱ्या वस्तू पाठवित आहोत. काल सांगली जिल्ह्यातून पूरग्रस्तांसाठी बिस्किट पाठविण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)