महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेस राष्ट्रीय पुरस्कार

पुणे – राष्ट्रीय राज्य सहकारी बॅंक महासंघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेस गतवर्षीच्या केलेल्या सर्वकष कामगिरीबद्धल राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रीय सहकारी आयोगाचे अध्यक्ष खासदार चंद्रपालसिंग यादव,नाबार्डचे जॉईन्ट मॅनेजिंग डायरेक्‍टर आर. अमालोरपवनाथन तसेच राष्ट्रीय राज्य सहकारी बॅंक महासंघाचे अध्यक्ष दिलीप संघानी व कार्यकारी संचालक सुब्रम्हणम उपस्थित होते.

राज्य सहकारी बॅंकानी त्यांच्या वार्षिक धोरणानुसार शेतकऱ्यांसह विविध घटकांना केलेला कर्जपुरवठा प्राथमिक कृषी सहकारी पंतसस्थांना सक्षम करण्यासाठी केलेले प्रयत्न राज्यातील जिल्हा बॅकाना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षणासह विविध स्तरावर केलेले प्रयत्न, केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावीपणे केलेली अंमलबजावणी या सर्व निकषांची पूर्तता करण्यामध्ये अग्रेसर ठरलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेस सर्वकष कामगिरी या सदराखाली राज्य सहकारी महासंघाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)