महाराष्ट्र बॅंकेचा शेतकरी मेळावा उत्साहात

पाल ः उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना अभिषेक पवार. व्यासपीठावरील देवराज पाटील, रुपेश धुमाळ, भास्कर गोरे.

काशिळ, दि. 31 (वार्ताहर) – शेतकऱ्यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा आर्थिक स्तर उंचावत आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक वाटचालीत महत्वपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन बॅंक ऑफ महाराष्ट्र काशीळ (ता. सातारा) शाखेचे व्यवस्थापक अभिषेक पवार यांनी केले.
बॅंक ऑफ महाराष्ट्रच्यावतीने पाल येथील ग्रामसचिवालयामध्ये आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज (दादा) पाटील होते.
अभिषेक पवार म्हणाले, सध्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्यावतीने शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी यांच्याकरिता विविध योजना सुरू आहेत. यामध्ये पीक कर्ज, मध्यम मुदत कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, प्रधानमंत्री मुद्रा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती आणि विमा योजना इत्यादी योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर आपल्या पाल्यांसाठी सुरू केलेल्या आहेत.
या मेळाव्यास सरपंच जगन्नाथ पालकर, उपसरपंच जमीर मुल्ला, कृषिभूषण संजय गोरे, सह्याद्री कारखान्याचे संचालक भास्कर गोरे, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे संजय तोफखाने, विमा कंपनीचे रुपेश धुमाळ, व्यवसाय प्रतिनिधी संदेश माने, गणेश कदम, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, कर्मचारी, तसेच पाल, शिरगाव, वेखंडवाडी, भगतवाडीसह परिसरातील शेतकरी व बॅंकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार उद्धवराव फाळके यांनी मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)