महाराष्ट्र क्रांती सेनेचे कार्यालय पाडले

वाघोली- आव्हाळवाडी रस्त्यालगतच्या गायरान जमिनीवर महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने उभारण्यात आलेले संपर्क कार्यालयाचे अतिक्रमण वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने आज दुपारी पाडण्यात आले. गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र क्रांती सेनेच्या संपर्क कार्यालयावरच ग्रामपंचायतीने कारवाई केल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. यापुढे गायरान जमिनीवर नव्याने अतिक्रमण होऊ देणार नसल्याचे सरपंच वसुंधरा उबाळे यांनी सांगितले. नवीन अतिक्रमण झाल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन उबाळे यांनी सांगितले.
वाघोली-आव्हाळवाडी रस्त्यालगत असलेल्या गायरान गट नंबर 1123 मध्ये जुनी अतिक्रमणे आहेत. याच भागामध्ये महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने अतिक्रमण करून पत्राशेडचे संपर्क कार्यालय बांधण्यात येत होते. याची माहिती मिळताच सरपंच वसुंधरा उबाळे, ग्रामविकास अधिकारी मधुकर दाते, सदस्य शिवदास उबाळे, पूजा भाडळे, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सदर संपर्क कार्यालयाचे अतिक्रमण तत्काळ हटविले. अतिक्रमणासाठी वापरलेले पत्रे, फरशा, अँगल ग्रामपंचायतीने जप्त केले आहे, त्याचप्रमाणे याठिकाणी घेण्यात आलेली अनधिकृत नळाची पाईप लाईनही तोडण्यात आली. जुनी अतिक्रमण वगळता वाघोली गावातील गायरान जमिनीवर होणारी नवीन अतिक्रमणे होऊ देणार नसून झाल्यास तात्काळ पाडण्यात येईल, असे सरपंच वसुंधरा उबाळे व ग्रामपंचायत सदस्य शिवदास उबाळे यांनी सांगितले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)