महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी होणार संयुक्त बैठक

नवी दिल्लीत मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व विधितज्ज्ञ जाणार


दोन महिन्यात प्रतिज्ञापत्र तयार करणार


मुख्य सचिवांच्या बैठकीत निर्णय

मुंबई – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असताना या प्रश्नाला गती देण्यासाठी नवी दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि न्यायालयात बाजू मांडणारे विधिज्ज्ञ यांचा समावेश राहणार आहे. गुरूवारी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मंत्रालयात मुख्य सचिवांच्या दालनात सीमाप्रश्नाच्या संदर्भात बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. सीमाप्रश्नी नवी दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेण्याबाबत बैठकीत एकमत झाले. या बैठकीला ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरीश साळवे तसेच अन्य वकील उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे. हे प्रतिज्ञापत्र दोन महिन्यात तयार करण्याची सूचना मुख्य सचिवांनी केली. याशिवाय सीमा भागातील प्रश्न तसेच सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात दर दोन महिन्यांनी बैठक घेण्याचे निश्‍चित करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक सरकारने अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज बाद झाल्यानंतर साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याविषयी बैठकीत चर्चा झाली. साक्षीदार म्हणून राज्याचे माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर, माजी पणन संचालक दिनेश ओऊळकर, पुण्यातील गोखल इ्‌स्टिटट्यूटचे संचालक राजस परचुरे, भाषातज्ज्ञ सोनल कुलकर्णी, संस्कृती विषयाचे अभ्यासक डॉ. मुटाटकर, लोकेच्छा या विषयावर बेळगावचे माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. प्रकाश पवार आणि राज्य पुनर्रचनेच्या विषयावर भारती पाटील यांचे प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

या बैठकीला ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, डॉ. शिवाजी जाधव, माजी आमदार अरविंद पाटील, संभाजी पाटील, मध्यवर्ती एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगळे, दिनेश ओऊळकर, समन्वयक डॉ. संतोष काकडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)