महाराष्ट्रातून खरेदी केलेल्या ९५ टक्के तुरीवर अजूनही प्रक्रिया नाही

मुंबई : राज्य शासनाने महाराष्ट्रातून मागील वर्षी जवळपास ३ हजार कोटी रुपयांची तूर खरेदी केली आहे. मात्र, त्यातील सुमारे ९५ टक्के तुरीवर प्रक्रिया करणे बाकी आहे. शिवाय त्यापासून डाळनिर्मितीदेखील थांबली आहे. यामुळे शासनाला जवळपास १ हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

कृषि विभागातील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरेदी करण्यात आलेल्या तुरीच्या कवचाचे आयुष्य अत्यल्प असते. जर हा साठा निरुपयोगी झाला, तर तो फेकून द्यावा लागेल.

राज्य शासनाने तुरीची खरेदी ५०५० रु./क्विंटल भावाप्रमाणे केली. मात्र सध्या बाजारात तुरीचा भाव ३,२०० रु./क्विंटलपेक्षा जास्त नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शासनाला फटका सहन करावा लागत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)