महाराष्ट्रातील १५ उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार

नवी दिल्ली : बांधकाम, उत्पादन , सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रात सुरक्षाविषयक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील १५ उद्योग संस्थांना राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने केंद्रीय उद्योग राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेच्या वतीने देण्यात येणारे सुरक्षा पुरस्कार आज नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आले. देशातील ७२ व्यवस्थापनांना सुरक्षा विषयक केलेल्या उल्लेखनीय कामासाठी सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेचे अध्यक्ष सतीश रेड्डी, उपाध्यक्ष अरविंद दोशी, राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेच्या वित्त विभागाचे अध्यक्ष कल्याण चक्रवर्ती, श्रम व रोजगार विभागाचे अतिरिक्त सचिव हिरालाल समरिया व राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेचे महासंचालक व्ही.बी. संत उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)