महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा : ‘स्वच्छ सर्वेक्षणा’त देशभरातून साताऱ्याची बाजी

केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने देशातील सर्व जिल्ह्यांचे गुणांकन ठरविण्यासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण’ हा कार्यक्रम  1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाचा निकाल आज जाहीर झाला असून देशभरातील जिल्ह्यांना मागे सोडत महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याने बाजी मारली आहे.

गुणात्मक आणि संख्यात्मक अंकांच्या आधारे स्वतंत्र सर्वेक्षण संस्थेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण हा देशव्यापी सर्वेक्षणाचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला होता. यामध्ये देशभरातील 698 जिल्हे सहभागी झाले होते. तर महाराष्ट्रातील 340 गावांमध्ये सर्वेक्षण झाले होते. या सर्वेक्षणात ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रार्थना स्थळे, यात्रास्थळे, बाजार तळ अशा विविध ठिकाणांची तपासणी करण्यात आली. याआधारे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याने देशभरातून प्रथम क्रमांकाचा मान मिळवला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, सातारा जिल्ह्याला 2 ऑक्‍टोबर 2018 रोजी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)