महारक्तदान शिबिरात 3347 जणांचे रक्तदान

मंचर- बजरंग दल आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तालुकेच्या वतीने धर्मवीर चंद्रशेखर बाणखेले यांच्या सातव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित महारक्तदान सप्ताहास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अकरा ठिकाणी आयोजित शिबिरात 2183 लोकांनी रक्तदान केले. याशिवाय आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्‍यातील दहा गावात आयोजित शिबिरात 1164 लोकांनी रक्तदान केले, अशी माहिती विश्‍वहिंदु परिषदेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष माऊली बोऱ्हाडे आणि बजरंग दलाचे तालुका संयोजक संतोष खामकर यांनी दिली.
बजरंग दलाच्या वतीने मंचर, राजगुरुनगर, नारायणगाव, घोडेगाव, शिनोली, कळंब, महाळुंगे पडवळ, अवसरी, पेठ, पारगाव शिंगवे, ओतुर, कवठे येमाई गावात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास शासनाचा एक लक्ष तेरा कोटी वृक्ष या वृक्षलागवड योजनेअंतर्गत एक झाड तसेच प्लास्टिक बंदीच्या समर्थनात एक कापडी पिशवी भेट देण्यात आली. रक्तदान सप्ताहाच्या उद्‌घाटन प्रसंगी मंचर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, तहसीलदार रविंद्र सबनीस, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, रक्तदान सप्ताहाचे नियोजन गणेश गाडे, बाबाजी चासकर, उमेश कंधारे, अमित बोऱ्हाडे, गणेश लोखंडे, सुमित शिनगारे, योगेश लंघे, प्रतीक चिखले, सागर काळे, गणेश घोडेकर, विशाल बाणखेले,अमोल रावत, वीरेंद्र भागवत, नितीन चासकर, दत्तात्रेय पोखरकर, तान्हाजी ढोबळे आदी उपस्थित होते.
याशिवाय प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव ,जुन्नर, शिरूर तालुक्‍यातील दहा गावात आयोजित शिबिरात 1164 लोकांनी रक्तदान केले, अशी माहिती प्रतिष्ठाणचे संस्थापक सुहास बाणखेले यांनी दिली. या शिबिराचे उद्‌घाटन कल्पना बाणखेले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, भाजपाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष संजय थोरात, हर्षल मोरडे, युवराज बाणखेले, वसंत बाणखेले, मंगेश बाणखेले, लक्ष्मण बाणखेले आदींनी भेट दिली. निमगाव सावा येथे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन केले. उपजिल्हा रुग्णालय मंचर,डॉक्‍टर घाडगे हॉस्पिटल रांजणी, जिल्हा परिषद शाळा अवसरी खुर्द, हुतात्मा बाबू गेनू स्मारक महाळुंगे पडवळ, कमला देवी माता मंदिर कळंब,चैतन्य विद्यालय ओतुर, प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा, जय हिंद हाऊसिंग चाकण, डॉक्‍टर पोखरकर पिंपरखेड, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी हाजी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष संतोष मोरडे, बाबू बोऱ्हाडे, अक्षय वाघ, अजित जाधव, किरण भालेराव, क्षितिज कहडणे, अक्षय सोलाट, निखिल कामठे, अमोल दावत, राहुल सादक, हर्षल थोरात, मेहुल भंडारी, अभिषेक बाणखेले, अक्षय थोरात, प्रतीक बनबेरू, प्रणील नाकिल, संदीप मोरडे, सौरभ मेहेर, पप्पू गाढवे,सोनू शिंदे, परेश खुडे, चेतन भोर, चेतन बाणखेले, चेतन भोर आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)