महाभियोग म्हणजे न्याय व्यवस्थेवर हल्लाच

केंद्रीय मंत्री विजय गोयल यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली – सरन्यायाधिशांच्या विरोधात कॉंग्रेसच्या पुढाकाराने सादर झालेला महाभियोग म्हणजे न्याय व्यवस्थेवरील हल्लाच आहे असे केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी म्हटले आहे. न्या लोया प्रकरणात आपल्याला हवा तसा निकाल कॉंग्रेसला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळू शकलेला नाही म्हणूनच त्यांनी आकसाने हा प्रस्ताव दाखल केला आहे असा आरोपही त्यांनी केला.

कॉंग्रेसने सादर केलेल्या या प्रस्तावाला अन्य सात राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून त्यात त्यांनी सरन्यायाधिशांना हटवावे अशी थेट मागणी केली आहे. त्यांनी त्यात महाभियोग असा शब्दच वापरलेला नाही असेही गोयल यांनी म्हटले आहे. घटनेच्या कलम 124 (4) अन्वये त्यांनी हा प्रस्ताव दाखल केला असून या कलमात केवळ सरन्यायाधिशांना हटवण्याची तरतूद आहे त्यात महाभियोगाची तरतूद नाही त्यामुळे त्यांचा हा प्रस्ताव फेटाळला जाण्याची शक्‍यता आहे असेही गोयल यांनी निदर्शनाला आणून दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)