महापौर-पक्षनेत्यांमध्ये विसंवाद

पिंपरी – शहरातील सर्व डीपी रस्त्यांवर झालेली बांधकामे जमीनदोस्त करण्याची घोषणा महापौर राहुल जाधव यांनी केली. मात्र, सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत असलेला व भाजपला याचा फटका बसू शकेल, अशा घोषणेची खुद्द सभागृह नेते एकनाथ पवार यांना माहिती नसल्याची बाब उघड झाली आहे. एरव्ही अजित पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या आरोपांवर क्षणांत प्रतिक्रिया देणारे पवार यांना मात्र या घोषणेबाबत विचारणा केली असता, महापौरांच्या वक्तव्याची माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो, असा सावध पावित्रा घेतला. त्यामुळे सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये संवादाचा अभाव असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

शहरातील अनधिकृत बांधकामांमुळे शहराचे नाव राज्यात सर्वदूर पोचले आहे. शहरातील सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. शहराच्या मंजूर विकास आराखड्यातील रस्त्यांवर बांधकामे झाल्याने काही ठिकाणचे रस्ते विकसित होऊ शकलेले नाहीत. या सर्व रस्त्यांवरून दळण-वळण सुविधा सुरु करण्याचा महापौर राहुल जाधव यांचा मानस आहे. त्याकरिता महापालिकेचा नगररचना विभाग आणि बांधकाम परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन, त्यांनी शहरातील रखडलेल्या रस्त्यांची माहिती घेतली आहे. तसेच येत्या पंधरा दिवसातील “ऍक्‍शन प्लॅन’ देखील तयार केला आहे. शहरातील रस्ते व आरक्षित जागांवरील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई हा संवेदनशील विषय निकाली काढण्यासाठी महापौर जाधव यांनी अधिकाऱ्यांना थेट कारवाईचे आदेश दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, हा संवेदनशील विषय हाताळताना दिलेल्या आदेशाची सभागृह नेते एकनाथ पवार यांना माहिती नाही. याबाबत प्रसार माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्‍नावर मात्र, महापौर जाधव यांच्या या वक्तव्याची माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो, अशी सावध भूमिका त्यांनी घेतली.

माझ्यावर कोणाचाही “कंट्रोल’ नाही
शहराचा प्रथम नागरिक या नात्याने शहरातील नागरिकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच विकासकामे मार्गी लावण्यावर माझा भर असणार आहे. ही विकास कामे मार्गी लावण्यात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई अटळ आहे. माझ्यावर कोणताही राजकीय दबाव नसल्याचे सांगत माझ्यावर कोणाचाही “कंट्रोल’ नाही, अशा शब्दांत महापौर राहुल जाधव यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)