महापौर, उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

पिंपरी – महापालिकेच्या नवीन महापौर आणि उपमहापौर पदासाठी मंगळवारी (दि. 31) उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर लगेच महापौर, उपमहापौर कोण होणार हे स्पष्ट होणार असून महापौरपदाची प्रत्यक्ष निवडणूक शनिवारी (दि. 4 ) रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेत होणार आहे. दरम्यान, महापौरपदासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे, राहुल जाधव, संतोष लोंढे, शशिकांत कदम व नामदेव ढाके यांच्यात तीव्र स्पर्धा असून त्यांनी वरिष्ठांकडे “फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी (दि. 24) आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यानंतर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी महापौर आणि उपमहापौर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या मंगळवारी (दि. 31) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत महापौर, उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, महापौरपदासाठी आमदार लक्ष्मण जगताप समर्थक नगरसेवक शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम व नामदेव ढाके आणि आमदार महेश लांडगे समर्थक राहुल जाधव, संतोष लोंढे यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. स्थायी समिती सभापतीपद चिंचवडकडे असल्यामुळे महापौरपद भोसरीकडे ही चिंचवडकडे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)