महापुरुषांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत नेणार : महापौर जाधव

पिंपरी-सर्व महापुरुषांच्या विचारांचे प्रबोधन पर्व साजरे करण्यासाठी महानगरपलिका प्रयत्नशील आहे. त्यामाध्यमातून महापुरुषांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न होईल, असा विश्‍वास महापौर राहुल जाधव यांनी व्यक्‍त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्व 2019 चा समारोप सुमारे 250 कलावंतांच्या संचाने सादर केलेल्या “मराठ्यांची गौरवगाथा’ या भव्य नाट्य प्रयोगाने झाला. भक्‍ती-शक्‍ती समूह शिल्प उद्यान परिसर, निगडी येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. यावेळी ते बोलत होते.

त्यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेविका अनुराधा गोरखे, शैलजा मोरे, शर्मिला बाबर, नगरसेवक विलास मडीगेरी, राजू मिसाळ, अमित गावडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, अश्‍विनी चिखले, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 ते 400 लढाया जिंकल्या असून आपण त्यांचे मावळे आहोत. देशावर आलेल्या कोणत्याही संकटाचा आपण सर्वांनी एकजुटीने सामना केला पाहिजे तरच आपण खरे मावळे शोभून दिसू,असेही ते म्हणाले.
यावेळी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
निगडी: महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्व 2019 चा समारोप “मराठ्यांची गौरवगाथा’ या भव्य नाट्यप्रयोगाने झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)