महापालिकेत वैद्यकीय कक्ष सुरु करण्याची मागणी

 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात शेकडो कर्मचारी, अधिकारी काम करतात, तसेच विविध कारणांमुळे दिवसभरात शेकडो नागरिक मुख्यालयाला भेट देतात. मात्र, वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत कोणतीही वैद्यकीय मदत मिळत नसल्याने, मुख्यालयात वैद्यकीय कक्ष सुरु करण्याची मागण व्विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिका मुख्यालयात सुमारे दीड ते दोन हजार अधिकारी कर्मचारी विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. त्याच प्रमाणे विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व हजारो नागरीकांना शासकीय कामानिमित्त मुख्यालयामध्ये दररोज राबता असतो. दुर्दैवाने मुख्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अथवा नागरिकांना तातडीची वैद्यकीय सुविधेची गरज पडल्यास मुख्यालयातच नव्हे तर मुख्यालयाच्या आसपास खाजगी अथवा सरकारी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. एखाद्या व्यक्‍लिा तातडीची वैद्यकीय सुविधेची गरज निर्माण झाल्यास त्याला संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये न्यावे लागते. त्यासाठी किमान अर्धातास लागतो. तोपर्यंत एखाद्या कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतू शकते. यापूर्वी असे प्रसंग घडलेले आहेत, असे या निवेदनात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)