महापालिकेच्या अपघात विम्याचा फायदा एका कुटुंबाला झाला

पुणे – महापालिकेच्यावतीने नियमितपणे मिळकतकर भरणाऱ्या मिळकतधारकांसाठी सुरू केलेल्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेचा लाभ कोथरूड येथील एका कुटुंबाला झाला. महापालिकेने उतरविलेल्या विम्यामुळे अपघातात मरण पावलेल्या या व्यक्तीच्या कुटुंबाला आधार मिळाला आहे.

एक महिन्यापूर्वी कोथरूड येथे राहाणारे बाबासाहेब जाधवर हे रस्त्यावर उभे असताना एका मोटारीने त्यांना धडक दिली. या अपघातात जाधवर यांचा मृत्यु झाला. महापालिकेला अपघातासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने जाधवर यांच्या कुटुंबियांना या योजनेअंतर्गत मदत मिळावी यासाठी तातडीने प्रयत्न केले. विम्याच्या हक्कासाठी आवश्‍यक तांत्रिक प्रक्रिया पार पाडल्यानंतर नुकतेच आरटीजीएस माध्यमातून जाधवर यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. या योजनेची माहिती अधिकाअधिक मिळकतधारकांना व्हावी यासाठी ससूनसह शहरातील सर्वच रुग्णालयात या योजनेची पोस्टर्स लावण्यात आली आहेत, अशी माहिती सहआरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2018-19 च्या अंदाजपत्रकामध्ये नियमीतपणे मिळकतकर भरणाऱ्या मिळकतधारकांसाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पंडीत दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना सुरू केली आहे. नियमीतपणे मिळकतकर भरणाऱ्या मिळकतधारकांचा महापालिकेच्यावतीने विमा उतरविण्यात आला आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये करआकारणी झालेल्या सुमारे साडेआठ लाख मिळकती आहेत. या मिळकती ज्यांच्या नावे आहेत, त्या कुटुंबप्रमुखाचा अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास या विमा योजनेतून त्यांना मदत मिळणार आहे.

योजनेचे हे पहिलेच वर्ष असून, एक मार्च ते 28 फेब्रुवारी 2019 या आर्थिक वर्षासाठी ही योजना आहे. विमा कंपनीचा प्रिमीयम भरण्यासाठी अंदाजपत्रकात 10 कोटी रुपये तरतूद केली होती. ग्रुपमध्ये हा विमा काढण्यात आल्याने यासाठी महापालिकेने चार कोटी 67 लाख रुपये प्रिमियम भरला आहे, असेही डॉ. वावरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)