महापालिकेचे बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्यास अटक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे बनावट प्रमाणपत्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. महापालिका कर्मचाऱ्याला संशय आल्याने या तरुणाला हटकल्यामुळे ही बाब उघडकीस आली आहे. समदेश रामचंद्र जाधव (वय 23 रा. तानाजी नढे चाळ, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून महापालिका आयुकतांची सही असलेले बनावट ओळखपत्र जप्त केले आहे. महापालिका मुख्यालयात जाधव बनावट ओळखपत्र लावून फिरत होता. त्या ओळखपत्रावर आरोग्य विभागाचा मजूर असा उल्लेख होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. महापालिकेत नोकरीस लावतो, असे सांगत अनेकांची जाधव याने आर्थिक फसवणूक केली होती. त्यानंतर सुरक्षा विभागप्रमुख उदय जरांडे यांनी त्याचे छायाचित्र मिळवून,ते सर्व कर्मचाऱ्यांना पाठविले होते. त्यावरून तो बनावट ओळखपत्र घालून फिरत असल्याची बाब उघडकीस आली. याप्रकरणी उदय जरांडे यांनी फिर्याद दिली असून, पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.